September 16, 2026

बारामतीत बनावट सिगारेटचा साठा जप्त; ₹११.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

IMG_20260731_180608

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर परिसरात बनावट सिगारेटची वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत बनावट सिगारेटचा साठा आणि मालवाहू वाहनासह एकूण ₹११ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश बेदानसिंग तोमर, हे Anvesh IPR Services या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असून त्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी कारवाईदरम्यान गोल्ड फ्लेक व गोल्ड फ्लेक लाईट १०७ या नावाने विक्रीसाठी आणण्यात आलेल्या कथित बनावट सिगारेटचा मोठा साठा तसेच मालवाहू टाटा पिकअप वाहन जप्त केले. प्राथमिक तपासात हा माल ग्राहकांना मूळ कंपनीचा असल्याचा आभास निर्माण करून विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणात हुजेब फिरोज बागवान, रयान अयुब खान, जाकीर अल्लाउद्दीन शेख आणि पप्पू निशाद यांचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!