November 1, 2026

सणासुदीच्या काळात बारामती वाहतूक पोलिसांची ठराविक मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहरनजर?

IMG_20261101_124912

बारामती : सणासुदीच्या काळात बारामती शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना बारामती-भिगवण रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मार्गावरील अनेक मॉल आणि बाजारपेठांसमोर असलेल्या सर्व्हिस रोडवर बेकायदा वाहनांची पार्किंग होत आहेच; मात्र आता मुख्य रस्त्यावरही चारचाकी वाहने उभी करून ग्राहक तासनतास खरेदीसाठी जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून मिळत आहेत.

भिगवण रोडवर आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. अशा परिस्थितीत संबंधित व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे करून पार्किंगच्या जागाच गायब केल्या आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने त्याचा भार थेट सार्वजनिक रस्त्यांवर पडत आहे. सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात, तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरही चारचाकी वाहने लावली जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळात वाहतुकीचा ताण वाढलेला असतानाही अशा बेकायदा पार्किंगवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. ठराविक मोठ्या व्यापाऱ्यांच्या मॉल आणि दुकानांसमोरील पार्किंगकडे वाहतूक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सामान्य वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाते; मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या मॉलसमोर आणि बाजारपेठांसमोर रस्ते अडवून वाहने उभी केली जात असताना वाहतूक पोलीस नेमकी कोणाची वाट पाहत आहेत? वाहतुकीच्या रस्त्यावरच पार्किंग होत असताना वाहतूक पोलीस झोपा काढतात का काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भिगवण रोडवरील अजिंक्य बाजार , मूल्य आणि विविधता मॉल, फर्स्ट क्राय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या परिसरात सर्विस रोड सहित मुख्य रस्त्यांवर पार्किंग होताना निदर्शनास येत आहे.

एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे भिगवण रोडवरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ठराविक व्यापाऱ्यांवरील मेहरनजर बाजूला ठेवून सर्वांसाठी समान नियम लागू करावेत आणि मुख्य रस्ता व सर्व्हिस रोडवरील बेकायदा पार्किंगवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे  सणासुदीच्या काळात जीवितहानी झाली तर जबाबदारी घेणार कोण पोलीस प्रशासन काही मॉल चालक व्यापारी

You may have missed

error: Content is protected !!