June 26, 2026

बेकायदा वैभव कमावणाऱ्या हवालदाराची बारामतीतून उचलबांगडी; ‘गोरख धंद्यां’वरही कारवाईची नागरिकांची मागणी

IMG_20260626_141149

बारामती  : अनेक दिवसांपासून बारामती शहरात एका हवालदाराच्या कथित बेकायदा वैभवाची आणि त्याच्याशी संबंधित चर्चेची जोरदार चर्चा सुरू होती. “बेकायदा संपत्ती कमावणारा तो हवालदार नेमका कोण?” तसेच “गोरख माया कमावणारा आणि गोरख धंदा करणारा तो गोरख कोण?” असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये वारंवार उपस्थित केले जात होते. सोशल मीडियापासून ते चौकाचौकांतील चर्चांपर्यंत या विषयाची मोठी चर्चा रंगत होती.

मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि त्यानंतर घडलेल्या प्रशासकीय हालचालींमुळे संबंधित हवालदाराची बारामतीतून उचलबांगडी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याची अन्यत्र बदली करण्यात आल्याची चर्चा असून, या निर्णयामुळे शहरात विविध चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरच जर गैरव्यवहार, हप्तेखोरी किंवा बेकायदा संपत्ती कमावल्याचे आरोप होत असतील, तर त्यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या प्रतिमेला धक्का बसतो. अशा प्रवृत्तींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिमाही मलीन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बारामतीत आता केवळ एका हवालदाराच्या बदलीवर समाधान न मानता, हप्तेखोरीच्या माध्यमातून फुगलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “हप्ता खाऊन ढेकण्यासारखे फुगलेले” अधिकारी वेळेत ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

याचबरोबर, कथित ‘गोरख धंदे’ आणि त्यामागील व्यक्तींविषयीही सर्वंकष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि बारामतीत भ्रष्टाचार व हप्तेखोरीला कायमचा आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

या दोन्ही हप्तेखोर हवालदाराच्या तक्रारी आमच्या माध्यमातून प्रशासकीय दरबारी देण्यात आल्या असून यापुढे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या बातम्या केल्या जातील याची वाचकांनी नोंद घ्यावी

You may have missed

error: Content is protected !!