June 28, 2026

इव्हिएम ठेवलेल्या गोडावूनचे काही काळ सीसीटीव्ही बंद

IMG_20240513_185747

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर इव्हिएम ठेवलेल्या गोडावूनचे काही काळ सीसीटिव्ही बंद असल्याने उमेदवार सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमात खंत व्यक्त केली’ आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान दि 7 मे रोजी पार पडल्यानंतर त्या इव्हिएम मशीन पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे,  तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब गंभीर असून संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. तसेच संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.तर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे ल्क्षमिकांत खाबिया यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही सुरु करण्यात आले आहेत.

मात्र या काही काळ बंद पडलेल्या सीसीटीव्हीमुळे राजकीय वर्तुळात अनेक शंका निर्माण केल्या जात आहेत.

You may have missed

error: Content is protected !!