September 27, 2026

तावरे – पवार भेट राजकीय वर्तुळात चर्चा

IMG_20240412_210259

 बारामती :  भाजपचे नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची सांगवी (ता. बारामती) येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट घेतली.  या दोन्ही नेत्यांची आमनेसामने चर्चा झाली असल्याने त्यामुळे एकूणच राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

सांगवी येथे ज्येष्ठ विधीतज्ञ कै. आर. ए. जगताप, लक्ष्मी सहकार संकूलचे संस्थापक कै. भिकोबा तावरे तसेच काकडे कुटुंबियांची जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांत्वन करण्यासाठी भेट घेतली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, व शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप आदी पदाधिकारी शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते.

 

एकूणच तावरे – पवार या भेटीने राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या, एकमेकांचे कट्टर वैरी भेटत असल्याने प्रसिद्धी माध्यमात देखील वृत्त प्रसिद्ध झाले मात्र या भेटी सांत्वनासाठी असल्याचे स्पष्ट झाले.

ब्रेकिंग न्यूजच्या नादात केलेला खटाटोप

दरम्यानच्या काळात माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांनी या भेटीचे प्रसिद्धी पत्रक काढले असून ही भेट काही पत्रकारांनी जाणीवपूर्वक आम्हांला अंधारात ठेवून ब्रेकिंग न्यूजच्या नादात केलेला खटाटोप आहे असे जाहीर केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार घरी आल्यानंतर एकमेकांच्या ताब्यतीची चौकशी केली तसेच पाहुणचार झाला या व्यतिरिक्त कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे चंद्रराव तावरे यांनी  बोलताना व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!