August 10, 2026

बारामतीत अधिकारी ‘नार’ चर्चेत; पुण्यातील घर, बारामतीतील थार आणि पंचतारांकित हॉटेलमधील भेटीगाठींचे गुपित काय?

IMG_20260810_113957

बारामती : बारामती आणि बारामतीत कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या चर्चा काही नव्या नाहीत. मागील काही दिवसांत पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याची ‘नार’ आणि तिच्यावरून चर्चेत आलेली थार बारामतीत चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, आता महसूल विभागातील एका महिला अधिकारी ‘नार’ भलतीच चर्चेत आली आहे.

या महिला अधिकाऱ्याने नुकतेच पुण्यात घेतलेले घर आणि बारामतीत वापरात असलेली महागडी थार याची चर्चा आता बारामतीच्या चौकाचौकात रंगू लागली आहे. पोलिसातली ‘नार’ आणि घेतलेली थार, तिथंच महसूल विभागातील ‘नार’ आणि घेतलेली थार… या सगळ्याचं गुपित नेमकं काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, ही महिला अधिकारी बारामतीतील सर्वात उच्चभ्रू आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये नित्यनियमाने सायंकाळच्या वेळी जात असल्याची चर्चा आहे. त्या हॉटेलमध्ये त्या नेमक्या कशासाठी जातात? एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये वारंवार जाणे सरकारी पगारात कसे परवडते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

त्यातच या महिला अधिकाऱ्यांना त्या उच्चभ्रू हॉटेलमध्ये वेगवेगळे पुरुष भेटण्यासाठी येत असल्याचीही चर्चा आहे. हे पुरुष नेमके कोण आहेत? त्यांना हॉटेलमध्येच भेटण्याचे कारण काय? या भेटींचा नेमका उद्देश काय? आणि ही महिला अधिकारी त्रयस्थ व्यक्तींना भेटण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये का जाते? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

बरं, ही अधिकारी एकटीच त्या हॉटेलमध्ये जात नाही, अशीही चर्चा आहे. काही सरकारी अधिकारी तिच्या साखळीत कार्यरत असून, या साखळीची ‘अॅक्टिव्हिटी’ हॉटेलमध्ये बसून चालते, असे दबक्या आवाजात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची चर्चा आहे.

मात्र, या सर्व चर्चांमध्ये नेमके तथ्य किती आणि अफवा किती, हा प्रश्न कायम आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पुण्यातील घराचा स्रोत, बारामतीत वापरात असलेले महागडे वाहन, पंचतारांकित हॉटेलमधील नियमित भेटीगाठी आणि तेथे होणाऱ्या कथित हालचाली याबाबत महसूल विभागातील या महिला अधिकाऱ्याच्या ‘नार’मागचे नेमके गुपित काय? महागडी जीवनशैली सरकारी पगारातून कशी परवडते? पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या भेटीगाठींचे कारण काय? आणि या कथित साखळीत नेमके कोण कोण कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे आता बारामतीकरांना मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

You may have missed

error: Content is protected !!