August 7, 2026

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार; ढाकाळे येथील तरुणाला अटक

IMG_20260807_141811

बारामती : महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी अभिषेक मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

फिर्यादी महिला माहेरच्या यात्रेसाठी गेली असताना आरोपीने तिला कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास त्याच्याकडील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे.

धमकीमुळे घाबरलेल्या महिलेचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या सासरी असलेल्या राहत्या घरी जाऊनही वेळोवेळी तिच्यावर जबरदस्ती केल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार २९ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तसेच त्यापूर्वीच्या सुमारे १५ दिवसांच्या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अभिषेक जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!