September 27, 2026

करंजेपूल येथे ऑनलाइन ‘बिंगो’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

IMG_20260620_195943

बारामती : बारामती तालुक्यातील करंजेपूल येथे ऑनलाइन ‘बिंगो’ जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व संगणक साहित्य असा एकूण 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजेपूल येथील सोमेश्वर साखर कारखाना रोडलगत सगुना चिकन सेंटरच्या भिंतीच्या आडोशाला ऑनलाइन बिंगो जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक डी. एस. वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.

या कारवाईदरम्यान रोहित राम सातपुते (वय 22) व शेखर उर्फ भय्या बाबुलाल पाटोळे (वय 35, दोघेही रा. करंजे, ता. बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी संगणकाद्वारे ऑनलाइन बिंगो जुगार सुरू असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी आरोपींकडून 6,900 रुपये रोख रक्कम, एक व्हिवो मोबाईल, एलईडी टीव्ही, सीपीयू, की-बोर्ड व माऊस असा एकूण 30,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!