June 27, 2026

बारामतीत पुन्हा कोयता काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न

fir-1

बारामती : बारामती शहरात गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून एखाद्या दक्षिण भारतातील चित्रपटाच्या सीन सारखाच प्रकार बारामतीत कोयता दाखवीत दहशत माजविणाऱ्यानी पसीन केल्याची घटना घडली आहे.

बारामतीतील भैय्यावस्ती येथे सलूनमध्ये काम करणाऱ्या एका इसमावर पूर्ववैमनस्यातुन लाल मिरचीची पूड तोंडावर टाकुन कोयता काढून तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणत अंगावर धावुन येऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाचा प्रकार घडला आहे या प्रकारात कोणाला कसली दुखापत झाली नाही मात्र फिर्यादी हातातून निसटल्याने फिर्यादीच्या दुकानाचे हल्लेखोरांनी नुकसान केले आहे.  या प्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात दुर्दैवाने फिर्यादीला दुखापत झाली नाही मात्र गुन्हेगारी प्रस्तात कोयता दहशत दिवसेंदिवस डोकेवर काढताना वारंवार समोर येत आहे.

You may have missed

error: Content is protected !!