June 27, 2026

बारामतीत रेल्वेखाली सापडून एकजनाचा जागीच मृत्यु

1570819361

बारामती : बारामतीत शहरातील तांदुळवाडी येथील 56 वर्षीय व्यक्ती रेल्वेखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

शनिवारी ( 15 फेब्रुवारी रोजी ) रात्री साधारण दहाच्या सुमारास पुण्यावरून बारामतीला येणाऱ्या रेल्वेखाली शहरातील तांदूळवाडी येथील जिजामातानगर येथे राहणारे दत्तात्रय हरिदास शेरकर वय 56 वर्षे यांचा तांदुळवातील दादापाटील नगर येथे रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात  मयत दाखल करण्यत आली आहे.

मागील चार दिवसात रेल्वे अपघातात जीव जाण्याची दुसरी घटना आहे यापूर्वी दि 13 फेब्रुवारी रोजी देखील एक महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

You may have missed

error: Content is protected !!