June 27, 2025

बारामतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

pcmc-28_202111728101

बारामती : बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 ते मार्च 2025 दरम्यान आरोपी मासाळ (पूर्ण नाव माहित नाही), रा. झारगडवाडी, ता. बारामती, जि. पुणे याने वेळोवेळी पीडितेचा विनयभंग केला. पीडिता शाळेत येत-जात असताना आरोपी तिला हातवारे करत बोलावण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, गावातील मंदिरात दर्शनासाठी गेलेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करत “तु मला खूप आवडते” असे म्हणत लज्जा उत्पन्न करणारे शब्द उच्चारले.

इतकेच नव्हे, तर एकदा घरी कोणी नसताना आरोपीने पीडितेला फोन करून “तु जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मासाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!