June 27, 2025

माळेगाव कारखाना निवडणुक; निकालाची उत्सुकता शिगेला

12

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागण्याची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. काल (२२ जून) रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘अण्णा काकांचे सहकार बचाव पॅनल विजय मिळवणार का ? की दादांचे वर्चस्व अबाधित राहणार ?’ अशी चर्चा सध्या चौका-चौकात रंगली आहे. मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता होती. यंदाची निवडणूक वेगळी ठरली आहे. प्रशासकीय यंत्रणांचा अतिरेकी हस्तक्षेप, पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि मतदानाच्या वेळेस झालेली प्रत्यक्ष स्थिती यामुळे निवडणूक प्रामाणिक राहिली का ?,  हा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, एका मताला चक्क १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत किंमत असल्याच्या चर्चांचा जोर चढला आहे. त्यामुळे ‘असा विजय कितपत खरा ?’ हा सवाल विचारला जात आहे.

दुसरीकडे, ‘आमदार तुम्हीच, खासदार तुम्हीच आणि कारखान्यावर पण तुम्हीच, मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का ?’ अशा स्वरूपाचा नाराजीचा सूरही कार्यकर्त्यांतून उमटताना दिसतो आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी सहकार बचाव पॅनलला मत दिले, असा दावा अण्णा काका समर्थक करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नातेवाईक संबंध, अडचणी आणि प्रशाकीय दबावतंत्र वापरून सभासदांना गोंजारल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत.

त्यातच मतदान प्रक्रियेच्या वेळेस झालेल्या विलंबामुळे मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. असो मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदार राजाने कल कळू दिला नाही मात्र ज्या ठिकाणी मतदार जास्त मतदान प्रक्रिया करीत होता किंवा जास्त वेळ घेत होता त्या-त्या केंद्रांवर क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा आहे त्यामुळे एकूणच त्याचठिकाणचे वातावरण संशयाच्या भोवर्यात आहे.  तर निकाल काय लागतो यावरून फक्त विजयी पॅनल ठरणार नाही, तर शेतकरी वर्गाने अनुभवाला महत्त्व दिलं की दबावतंत्राला याचाही निर्णयही येणाऱ्या काही तासात लागणार आहे.

error: Content is protected !!