July 23, 2026

नाझरे धरण भरले; कर्‍हा नदीपात्रात विसर्गाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Picsart_25-06-22_19-29-10-320

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

बारामती : पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाचा जलसाठा आज सायंकाळी ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वेगाने वाढत असून, पुढील २४ ते ४८ तासांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज धरण प्रशासनाने वर्तवला आहे.

या पार्श्वभूमीवर नाझरे धरण पूर नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणीसाठा वाढल्यास धरणाच्या स्वयंचलित सांडव्यांद्वारे कर्‍हा नदीपात्रात विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धरण प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:

  • कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरू नये.
  • नदीपात्रात जनावरे किंवा तत्सम साहित्य असल्यास ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना द्याव्यात व योग्य ती कार्यवाही करावी.

You may have missed

error: Content is protected !!