February 11, 2026

नगरपालिका ठेक्याने देणे आहे ?  अधिकारी सुस्त, ठेकेदार मदमस्त..

19-54-31-images_202105625603

बारामती : बारामती म्हटले की माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकसित बारामती अशी चर्चा देशभर आहे, याच बारामती शहराचे विकासाचे

मॉडल पूर्ण देशमन आहे. तर या विकास कामावर बारीक लक्ष ठेवून असलेले बारामतीचे शिल्पकार आणि पहारेकरी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या नावलौकिकावर मोलाचा वाटा आहे कारण शहरातील प्रत्येक विकास कामे त्यांच्याच निरीक्षणाखाली होतात आणि केली जातात. मात्र दादांसारख्या नेत्याने मोठ्या आकांताने आणि आत्मियतने या शहराचा विकास केला त्याच बारामतीच्या नगरपालिकेत सध्या अनागोन्धी कारभार सुरु असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

 सध्या बारामती नगरपालिकेवर प्रशासकीय कारभार सुरु आहे त्यामुळे नगरपालिकेत होत असलेल्या ठेकेदार रुपी आसुरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नागरिकांनी आवाज उठविला तरी आश्वासनाशिवाय त्यांच्या हाताला काही येत नाही आणि त्यामुळे बारामतीच्या चौकाचौकात नागरिकांमधेही या कारभाराविषयी मोठी खंत व्यक्त केली जात आहे.

सध्या बारामतीत अनेक विकास कामे सुरु आहेत मात्र या सुरु असलेल्या विकास कामांकडे ना नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे लक्ष आहे, ना काम करून घेणाऱ्या दुसऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे कारण सुरु कामांवर ठेकेदाराच्या दलालांचे तसेच एजंट यांचेच प्राबल्य पहायला मिळताना दिसत आहे.

तर अनेकदा संबंधित ठेकेदाराने सुरु असलेल्या कामाच्या माहितीचा फलकच गायब केलेला असतो त्यामुळे संबंधित सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी नेमके कोणते काम सुरु आहे आणि कोण काम कोणाच्या माध्यमातून करीत आहे याचा थांगपत्ता लागत नाही. ही कृती ठेकेदाराची चोरी नाही का ? असा सवाल उपस्थित होतो.

तर दादा बारामतीत येणार म्हटलं तर हे काम काराणारे प्रशासकीय एजेन्सी आणि टेंडर घेतलेले ठेकेदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी मग पहाटे पासून कामाच्या ठिकाणी रेंगाळायला सुरु करतात आणि दादांच्या पुढे-पुढे करणारेच पुन्हा त्या कावर फिरकतही नाहीत.

 याच बारामतीत एक नवीन डांबरी कारणाचा पायंडा पडला आहे तो म्हणजे रसत्याच्या दोन्ही बाजूला कट पट्टी सोडायची आणि पुन्हा त्याच पट्टीच्या नवीन खड्डा बनवायचा. ती सोडलेली कट पट्टी म्हणजे काय आणि कशासाठी सोडली हे आजतागायात समजले नाही.

आता नगरपालिका म्हटले की विकास कामे आली आणि विकास कामे म्हटले की टेंडर आली आणि टेंडर महटले की खाजगी ठेकेदारही आले बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या विविध कामे पूर्ण झाली आहेत तर काही ठिकाणी सुरु आहेत पण या ठेकेदारांमध्ये काही ठेकेदार असे आहेत की नगरपालिकेने त्या ठेकेदाराला टेंडर दिले आहे तो पण तो प्रत्यक्षात कधी सुरु असलेल्या कामावर आलाच आणि त्याने तो ठेका स्थानिक ठेकेदाराला काही मिळकतीच्या टक्का ठरवून ठेवलेला त्या समबीवर ठेका थर्ड पार्टी चालवीत आहे. प्रत्यक्षात मूळ ठेकेदार कधीही सुरु असलेल्या कामाकडे फिरकतही नाही. त्याने ज्या थर्ड पार्टीला ठेका दिलेला असतो तीच पार्टी या कामाचे सोयरसुतक पाहते आणि त्यामुळे एका टेबलवसन दुसऱ्या टेबलवर फक्त टक्का चालतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.  मग झालेल्या कामात दर्जा कसा चालेल, अशी देखील नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

 ठेकेदारांच्या बाबतीत आमच्या बारामतीत उलटी गंगा वाहताना सध्यातरी दिसते आहे. कारण अनेक ठेकेदार मनमानी करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय बाबु तक्रारी देऊन देखील कानाडोळा करीत आहेत, एवढे सगळे सुरु असताना मग प्रश्न पडतो की नगरपालिकने ठेका दिला आहे, का ? नगरपालिकेला ठेकेदार चालवीत आहेत,  शेवटी एवढेच म्हणावे लागेल की नगरपालिका ठेक्याने देणे आहे…?

error: Content is protected !!