September 13, 2026

आपले झाले शत्रू! गुन्हेगारी टेबलखालून फिरली चावी अन् झुंबाच्या सात लाखांचा पोलखोल

IMG_20260912_235945

बारामती : आपले झाले शत्रू, क्राइम टेबलला द्यावे लागत होते पाच टक्के आणि साहेबांच्या राईट हॅन्डचे कल्याण होऊ नये म्हणून पाच दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात भिगवणवरून बदलीवर आलेल्या कर्मचाऱ्याला मागील वसुली आणि इतिहासाच्या जोरावर डीबी अर्थात गुन्हे शोध पथकात स्थान मिळाले. आपल्या वर्चस्वाची धुळधान होईल म्हणून गुन्हेगारी टेबलच्या खालून चावी फिरवून झुंबाच्या सात लाखांचा पोलखोल झाला, तो विश्वासघाताने झाल्याची चर्चा  आहे.

कारण जेव्हा आपलेच सहकारी शत्रू होतात, तेव्हा मात्र सगळंच अलबेला असते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची खातरजमाई याच गुन्हेगारी टेबलच्या माध्यमातून झाली आणि आरोपीला न्यायालयात घेऊन जाणारी गाडी लाचखोराच्या दिमतीला उभी राहिली. लाल दिव्याची गाडी थांबताच सोकावलेला हात पुढे झाला आणि अलगद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

याच सोकावलेल्या हाताने उभारलेले आलिशान फार्म हाऊस, सहा आलिशान गाड्या, बारामतीतील पाच फ्लॅट, धरणाच्या काठावरील १५ एकर क्षेत्र तसेच लाखोंचा रोख स्वरूपातील मुद्देमाल असा रोकड आणि जंगम मुद्देमाल नियोजित खेळात अलगद आणि जाग्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. तर दुसरीकडे त्याच लाचखोरासोबत आलेले लाल दिव्याच्या गाडीत असलेले सहकारी मात्र अलबेल होते, अशी चर्चा सुरू आहे.

वर्चस्वासाठीचा परिपाठ की निष्क्रियतेचा कळस?

पोलीस खात्यात वर्चस्वासाठी चाललेला हा परिपाठातील ‘चॉकलेट हिरो’ असलेल्या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेचे उत्तम उदाहरण आहे, अशी चर्चा आता बारामतीच्या चौक चौकात  रंगू लागली आहे. या ‘चॉकलेट हिरो’ला दौंडचा ‘दादा गुरु’ म्हणून लाभला असल्याने ‘दुर्जनं प्रथम वंदिते’ म्हणून पोलीस खाते सुरू आहे का काय?, असा सवालही उपस्थित होत आहे. चॉकलेट हिरोने दौंड चे सल्ले घेण्यापेक्षा बारामतीत जास्त लक्ष घालून काम करावे अन्यथा  विश्वासाने जवळ केलेला दौंडचा गुरु बारामतीत येऊन ठाण मांडेल आणि चॉकलेट हिरो बारामतीतून अलगद बाहेर जाईल?  हे मात्र नक्की.

गुन्हेगारी टेबल, वसुली आणि अंतर्गत वर्चस्व तसेच लाचखोरीच्या प्रकरणाभोवती निर्माण झालेल्या या चर्चेमुळे बारामतीच्या पोलीस यंत्रणेतील अंतर्गत कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्व बाबींची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी होणार का?, तसेच संबंधितांच्या कथित मालमत्तेचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास केला जाणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!