June 9, 2026

गुटखा साम्राज्याला धडकी; आयुक्त येणार असल्याच्या चर्चेने बेकायदा व्यवहार थांबले

file_0000000024447208b28a1cef73da8e22

बारामती  : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे बारामती दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा शहर व परिसरात पसरताच अनेक संशयित बेकायदा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः गुटखा विक्रीशी संबंधित काही व्यावसायिकांनी सावध भूमिका घेत दोन दिवस आपले व्यवहार बंद ठेवल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

बारामती आणि परिसरात अनेक वर्षांपासून गुटख्याचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. तांदुळवाडीचा आणि  मळदचा व्यापारी अक्षरशा येत असलेल्या बातम्यांमुळे आणि अन्न आणि औषध  प्रशासनाचे अधिकारी येणार असल्याच्या आफवेमुळे त्यांची पळता भुई झाल्याच सूत्रांनी सांगितलं या व्यवसायिकांनी चक्क अनेक वर्षापासून ठाण मांडून राहिलेल्या आणि अवैध धंद्यातून बेकायदा वैभव कमावलेल्या गोरख धंद्यावाल्या पोलीस प्रशासनातील या हप्तेखोरांच्या पाठबळामुळे या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची चर्चा असतानाच, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य भेटीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही ठिकाणी गुटख्याचा पुरवठा अचानक थांबला, तर अनेक विक्रेत्यांनी दुकानांमध्ये साठा असूनही विक्री टाळल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, ही माहिती अधिकृत नसतानाही संबंधित गोरखधंदेवाल्यांपर्यंत अतिशय वेगाने पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरात बेकायदा व्यवसायांना संरक्षण देणारे काही मलिदाखोर प्रशासकीय कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत, त्यांच्यामार्फतच ही खबर पसरवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

या अफवेचा सर्वाधिक फटका किरकोळ विक्रेत्यांना बसल्याचे बोलले जात आहे. दोन दिवस गुटखा विक्री बंद राहिल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, गुटखा साखळीतील मोठे खेळाडू मात्र सुरक्षित राहण्यासाठी काही काळ भूमिगत झाल्याचेही सांगितले जात आहे.

बारामतीतील गुटखा साम्राज्य, त्यामागील आर्थिक हितसंबंध आणि त्याला मिळणारे कथित संरक्षण याबाबत नागरिकांमध्येही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदा व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!