June 8, 2026

पावशेर मटणासाठी मारामारी; शस्त्र हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

IMG_20260419_192941

बारामती : बारामती शहरात किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाची मारामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पावशेर मटणाच्या वादातून दोन मटन विक्रेत्यांमध्ये वाद पेटून बेकायदा जमाव जमवण्यात आला. यावेळी शस्त्राचा वापर करत फिर्यादीस गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या फिर्यादी माहितीनुसार, आरोपींनी एकत्र येत वाद घालत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर संतापाच्या भरात शस्त्र हल्ला करून फिर्यादीस गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी बेकायदा जमाव जमवणे, दंगल घडवणे तसेच शस्त्राचा वापर करणे यांसह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या बातमीत फिर्यादी व आरोपी यांची नावे जाणीवपूर्वक प्रकाशित करण्यात आलेली नाहीत, याची वाचकांनी नोंद घ्यावी. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!