June 28, 2026

चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोन गुन्हेगार जेरबंद ; ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त

taluka

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीची गाडी आडवी मारली आणि धारदार शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील ३८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले. तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांनी चैतन्य राजेंद्र केकान व धीरज हरिश्चंद्र पवार ( दोघेही रा. बारामती ) यांना ताब्यात घेतले. चौकशीतच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीतील दागिने तसेच विक्रीतून मिळालेली १ लाख ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार व दादा दराडे यांचा समावेश होता.

You may have missed

error: Content is protected !!