June 28, 2026

बारामतीच्या शासकीय आयटीआयचे प्राचार्य लाच घेताना सापडेल रंगेहात

IMG-20250319-WA0207

बारामती : बारामती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य अवधुत घिमाजी जाधवर (वय ५३) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रेणुका पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, बारामती येथे वार्षिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमणूक व परीक्षेत कोणतीही अडचण न आणण्याच्या बदल्यात त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे.

संबंधित तक्रार रामचंद्र विठ्ठल बंडगर यांनी केली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार जाधवर यांनी सुरुवातीला ८०,००० रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीअंती ४०,००० रुपयांत व्यवहार ठरला. बारामतीतील हॉटेल सिटी इन येथील लॉबीमध्ये ही लाच स्वीकारण्यात आली. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाधवर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!