June 28, 2026

बारामतीत पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

hang_201807106331

बारामती : पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामतीत उघडकीस आली आहे. पतीचे परस्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचा तसेच वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप असून, यामुळेच पीडितेने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आली आहे.

ही घटना 24 मे रोजी बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडली. पीडित महिलेने घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती शिवाजी देडे (रा. मासाळवाडी, बारामती) यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर तिचा पती शिवाजी देडे हे वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होते. शिवाय त्यांचे अन्य एका महिलेबरोबर अनैतिक संबंधही होते. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या पीडित महिलेने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!