June 28, 2026

बारामतीत घडली नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासऱ्यानेच सुनेवर केला बलात्कार

WhatsApp Image 2025-03-25 at 6.49.19 PM

बारामती : बारामती शहरामध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून चक्क सासऱ्यानेच सुनेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेच्या वडिलांना कर्करोग आहे तरी देखील सासरचे लोक नवविवाहित पिडीतेला माहेरवरून पाच तोळे सोने तसेच इतर कारणाने छळ करीत होते ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपातासाठी आग्रह धरला जात होता तसेच पिडीतेचा शारीरिक मानसिक छळ केला जात होता, तर पतीने स्वतःच्या बायकोशी अनैसर्गिक शरीरीक संबंध ठेवण्यास वारंवार भाग पाडले जात होते तसेच पतीचा विरोध केल्यास जबरी हाणामार होत होती, तर पती घरी नसताना चक्क लेकुरवाळ्या सुनेवर सासऱ्याने जबदस्तीने बलात्कार देखील केल्याची घटना घडली आहे, या घटनेनंतर पिढीतेने माहेरी जाऊन अहिल्यानगर पोलिसात भरोसासेलमध्ये फिर्याद दाखल केली मात्र भरोसा सेलमध्ये समुपदेशनासाठी सासरचे लोक जात नसल्या कारणाने नाईलाजाने पीडितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात  फिर्याद दाखल केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!