June 28, 2026

आभाळमायाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

IMG-20240625-WA0030
बारामती :  आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना  शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील महात्मा गांधी बालक मंदिर शाळा या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमासाठी बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आडाव तसेच शशिकांत शहा, शिक्षक, शेक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आभाळमाया ग्रुपच्या सुरभी ओसवाल, अर्चना भंडारी, अल्पा भंडारी, अंजली देसाई, कल्पना ओसवाल , लता ओसवाल, आरती भंडारी, शितल मुथा, मंजू बोराणा, सपना शहा, मेघना गुगळे, वैजयंती मेहता यांनी परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!