June 27, 2026

ॲड. बाळासाहेब शिंदे यांची बारामती तालुका पोलीस पाटील संघाच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड

IMG-20240311-WA0003
बारामती : ॲड. बाळासाहेब मल्हारी शिंदे यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने कायदेशीर सल्लागार, बारामती तालुका पदी निवड करण्यात आली.
 पोलीस पाटील संघाच्या वतीने पाहुणेवाडी, ता. बारामती याठिकाणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ व बारामती तालुका पोलीस पाटील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुका संघाच्या कार्यकारणीच्या पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ॲड. बाळासाहेब शिंदे यांना राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बी. बी. शिंदे पाटील यांच्या हस्ते निवडीचे सनदपत्र प्रदान करण्यात आले.
 ॲड. शिंदे यांची या पदावरील निवड हे त्यांच्या कायदेशीर क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाची पावती आहे. त्यांच्या या निवडीमुळे बारामती तालुक्यातील पोलीस पाटील संघाच्या कायदेशीर मार्गदर्शनाला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला बारामतीचे  प्रांतअधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, माळेगाव सहकारी कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, माजी चेअरमन चंदरराव तावरे, संचालक योगेश जगताप, जी. बी. गावडे व बारामती तालुक्यातील समस्त पोलीस पाटील उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!