बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंचे येलो, ऑरेंज बेल्ट परीक्षेत यश
बारामती : स्वामी विवेकानंद हॉल, अशोकनगर येथे बारामती कराटे क्लबच्या वतीने तसेच सेईकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली येलो व ऑरेंज बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बारामती कराटे क्लबच्या २१ खेळाडूंनी सहभाग घेतला.
यामध्ये १८ खेळाडूंनी येलो बेल्ट तर तीन खेळाडूंनी ऑरेंज बेल्ट परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. यशस्वी खेळाडूंचा बारामती नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा श्वेता योगेश नाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यशस्वी खेळाडूंमध्ये पहल दोशी, वीर शहा, पृथ्वीराज शिर्के, रियाश कोरडे, प्रणित विधाते, देवश राऊत, रिया गोलंडे, जय भांडवलकर, शौर्य राऊत, वेदा मेमाने, संस्कृती खोमणे, ऋतुजा राऊत, रुद्रा गोलंडे, युतिका चौधरी, अदिराज जगदाळे, मनस्वी भानसाने, आयुष सावंत, श्राव्या दोशी, अंगद हसबनीस, शौर्य सातव आणि देवांश काटे यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मिननाथ रमेश भोकरे तसेच क्लबच्या सचिव शुभांगी भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेतील यशाबद्दल खेळाडूंचे पालक व कराटे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
