June 2, 2026

बारामतीत दारूच्या पैशासाठी कोयत्याचा धाक; जीवे मारण्याची धमकी

IMG_20260412_171704

बारामती : दारू पिण्यासाठी पैसे दे, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत हातातील कोयत्याचा धाक दाखविल्याची घटना बारामती तालुक्यातील घाडगे वस्ती येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रकाश काटे यांनी फिर्याद दिली असून, आरोपी कुंदन काजळे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने हातातील कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!