बघतो काय म्हणत काढला कोयता
बारामती : “बघतो काय म्हणत काढला कोयता!” या धक्कादायक घटनेने बारामतीत खळबळ उडवली असून, याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शुभम लक्ष्मण गायकवाड (रा. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २ जुलै २०२५ रोजी रात्री ८.२० च्या सुमारास, तांबे नगर ते मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला, मेडिकल कॉलेजच्या भिंतीजवळ मित्रांसोबत उभे होते. याचवेळी माने व कटारिया, हे दोघे तेथे आले.
शुभम गायकवाड यांच्याकडे पाहून “काय रे आमच्याकडे काय बघतोस?” असे म्हणत माने याने अचानक हातातील कोयता काढून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार दिला. त्याचप्रमाणे कटारिया यानेही शुभम यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ कोयता मारून त्यांना जखमी केले.
या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी माने व कटारिया (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) या दोघा विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पथक तपासात करीत असून, हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असण्याची शक्यता आहे.
