अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ; पाच लाखांचा आफिम जप्त
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ५ लाखांहून अधिक किमतीचा अफीम आणि दोडा चुरा जप्त करत एका इसमाला अटक केली आहे. अर्जुन सुखाराम काला (वय ३१, रा. शिक्षक नगर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
ही कारवाई यश कॉम्प्लेक्स समोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी रोड येथे करण्यात आली. पोलिसांनी तपासणीदरम्यान आरोपीकडून २६५.५८ ग्रॅम अफीम तसेच १.७२८ किलो आफिम बोंडाची पावडर व दोडा चुरा पावडर असा एकूण ५, लाख १३ हजार १६० रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईत पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, तसेच पोलीस अंमलदार संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुन गायकवाड, स्वप्निल मिसाळ यांनी केला.
