June 28, 2026

बायको सोडचिट्टी देतनाही म्हणुन नवऱ्याने काढली तलवार

crime-1-5

बारामती : बारामतीत चक्क बायको सोडचिट्टी देत नाही म्हणुन नवऱ्याने तलवार काढल्याचा प्रकार घडला असुन या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर हाकीकात अशी की, बारामती तालुक्यातील मौजे वडगाव निंबाळकर, खोमणेवस्ती येथे पती सोबत झालेल्या वादामुळे पत्नी तिच्या वडिलांकडे माहेरी राहत आहे ती पतीला सोडचिट्टी देत नाही म्हणुन पती चक्क सासरवाडीत हत्यारबंद मित्र घेऊन गेला आणि पत्नी सोडचिट्टी देत नाही म्हणुन तिच्यावर तलवारीने वार केल्याचे घटना घडली आहे या प्रकरणी पती दीपक मदने आणि त्याचे इतर दोन साथीदार यांच्यावर शस्त्र अधिनियमाने वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!