अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा बारामती दौरा

बारामती : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांचा बारामती दौरा दि.28 फेब्रुवारी रोजी नियोजित असुन अनुसूचित जाती जमाती मधील पिडीत तसेच जे पिडीत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्यांना आपले म्हणणे गाऱ्हाणे आयोगासमोर सादर करायचे आहे त्यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांना शुक्रवार दि.28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 : वा सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस, भिगवण रोड बारामती येथे पिडीत तसेच जे पिडीत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्या नागरिकांनी आपली म्हणणे आणि गाऱ्हाने लेखी स्वरूपात हजर राहून सादर करण्याचे आवाहन अॅड. अक्षय गायकवाड यांनी केले आहे.