हातभट्टी दारू वाहतुक करणा-यावर पोलिसांची कारवाई

बारामती : अवैध गावठी हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यावर सुपा पोलिसांनी कारवाई करीत तीन लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहतूक करणारांवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरगाव येथे पेट्रोलिंग करीत असताना सहय्यक पोलिस इन्स्पेक्टर जयवंत ताकवणे पोलीस अंमलदार सचिन दरेकर सागर वाघमोडे, संतोष जावीर यांना बामतीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन हददीतुन एक चारचाकी टेम्पो मधुन गावठी हातभटट्टी देशी दारूची वाहतुक होणार आहे. सदरची माहीती प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली मोरगाव चौक येथे एक टेम्पो गाडी नं. एम एच ४२ ए क्यु २०१० ही गाडी थांबवुन गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३५ लीटर क्षमतेचे १३ कॅन्ड अवैध गावठी हातभट्टी दारू त्यामध्ये ४५५ लिटर दारू किंमत ४५००० व एक अवैध दारुची वाहतुक करणारा टेम्पो किंमत तीन लाख,५०,हजार असा एकुन तीन लाख,९५,हजार रुपये किमतीचा मुददेमाल मिळुन आला आहे. चारचाकी टेम्पो वरील चालक नामे अभिजीत मोहन शिंदे ( रा. माळेगाव ता. बारामती ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहय्यक पोलिस इन्स्पेक्टर जयवंत ताकवणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहय्यक पोलिस इन्स्पेक्टर जिनेश कोळी, जयवंत ताकवणे रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, सचिन वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, पियुश साळुंखे यांनी केली.