February 11, 2026

मांडुळांची विक्री करणा-या दोन युवकांना पोलीसांनी केले जेरबंद ; सुमारे १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडुळ केले जप्त

Red_Sand_Boa_Eryx_johnii_by_Ashahar_alias_Krishna_Khan
पुणे : प्रतिबंधीत मांडुळांची विक्री करणा-या दोन युवकांना वानवडी पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांचेकडुन सुमारे १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडुळ जप्त केले आहे.
दि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस उप निरीक्षक धनाजी टोणे, सहायक पोलीस उप निरीक्षक रमेश साबळे,पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, संदिप साळवे असे वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीत कोंबीग ऑपरेशन व अवैध धंदयावर कारवाई असताना पोलीस अंमलदार संदिप साळवे व सर्फराज देशमुख यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे मांडूळ जातीचे वन्यप्राणी घेवुन विक्री करण्यासाठी साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी पुणे येथे येणार आहेत. त्यानुसार दि. १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सापळा रचला असता  दोन इसम पोलिसांच्या निदर्शनास आले त्यापैकी एकाचे हातात लाल व काळे रंगाची बॅग दिसली. बातमीप्रमाणे खात्री होताच छापा घालून ताब्यात घेतले असता त्यांनी त्याची नावे १) महंमद कामराण अब्दुल करीम  ( वय ३० वर्षे रा. गुलबर्गा, कर्नाटक राज्य ) , २) मिथुन शेट्टीबा मंजुळे ( वय ३० वर्षे रा. विद्यानगर ता. निलंगा )  असे असल्याचे त्यांनी सांगीतले.
सदर इसमांचे कब्जात १० लाख रुपये किमतीचे एक रेडसन जातीचे मांडुळ  मिळुन आला. व तो वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत शेडयुल ३ मधील प्रतिबंधीत मांडुळ जातीचे सरपटनारे प्राणी असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी दोघांविरोधात  वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच  रेडसन जातीचे मांडूळ संचालक, वन्य प्राणी संग्राहालय, बावधान, पुणे याचे ताब्यात संरक्षणार्थ देणेत आले.
सदरची कारवाई वानवडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमनाथ कांबळे, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यांनी केली.
error: Content is protected !!