June 26, 2026

सुप्यात बेकायदा जमाव जमवुन बेदम मारहाण

images (1)

बारामती : बारामती तालुक्यातील मौजे सुपा येथे एका टोळक्या कडून बेकायदा जमाव जमवुन एकाला बेदम मारहाण करून दहशत  माजविण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील मौजे सुपा गावाच्या हद्दीत डायमंड चौकात रागात बघण्याच्या कारणावरून फिर्यादी रोहन संजय लोणकर यास आरोपी रोहित बापूराव पानसरे तसेच त्याचे पंधरा ते वीस साथीदार यांनी लाकडी काठी, दगड आणि फायटर याने बेदम मारहाण केली, यात फिर्यादीला जबर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर सुप्याच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत या प्रकरणी  सुपा पोलिस ठाण्यात 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!