October 24, 2025

संत श्रीपाद बाबा महाराज व संत रामदास महाराज पालखी सोहळ्याचे अंजनगावात जंगी स्वागत.

IMG-20240710-WA0041
बारामती :  संत श्रीपाद बाबा महाराज व संत रामदास महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे ग्रामस्थ यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
अंजनगाव येथे पालखी सोहळा आगमनावेळी  युवा उद्योजक इंद्रजीत वायसे व सर्व ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याचे फटाक्याची आतिषबाजी तसेच चौका-चौकत रांगोळी व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.  तसेच संध्याकाळचे कीर्तन राजाराम जगताप महाराज यांचे झाले, पालखीसोबत आलेल्या वारकरी यांची भोजन व्यवस्था हनुमंत वायसे व किरण परकाळे यांनी तसेच चहा व नाश्ता स्व. बापूराव कृष्णा कुचेकर यांच्या स्मरणात .प्रशांत कुचेकर व दादा कुचेकर या दोन्हीनी केली, यावेळी माजी सरपंच दिलीप परकाळे,  सोमेश्वर कारखान्याचे मा. संचालक बाळासाहेब परकाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. संचालक दादा मोरे. विष्णुपंत सस्ते, जालिंदर वायसे, पायी जाणाऱ्या दिंडीतील सर्व वारकरी महिला बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या,  तसेच स्वप्निल महाराज दौंडकर, प्रताप महाराज चव्हाण, हनुमंत महाराज कवितके, दिंडी चालक विद्या जगताप, गुरुदास महाराज जगताप, यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व आभार व्यक्त करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!