February 11, 2026

शहरातील बेकायदेशीर होर्डिंगवर नगरपालिका करणार कारवाई 

बारामतील उड्डाण पुलाशेजारी लागलेल्या होर्डिगचा प्लेक्स फाटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडाला आणि लाईटच्या खांबावर गेला आहे ही घटना होत असताना यात दोघे जन बचावले

बारामतील उड्डाण पुलाशेजारी लागलेल्या होर्डिगचा प्लेक्स फाटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडाला आणि लाईटच्या खांबावर गेला आहे ही घटना होत असताना यात दोघे जन बचावले

बारामती : बारामती शहर आणि परिसरात मोठ्याच्या मोठ्या होर्डिंगची स्पर्धा सुरु झाली आहे, ना कोणाचा परवाना, ना कोणाचे स्ट्रक्चर ऑडीट, शहर परिसरात ठीक ठिकाणी  बेकायदा होर्डिंग लागलेले पाहायला मिळत आहेत तर शहरात बेकायदा लागलेल्या होर्डींगवर  नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाग्पालीकेचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

मुंबईमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेची घटना ताजी असताना याबाबत बारामती नगरपालिका प्रशासन काय कारवाई करणार ? हा प्रश्नच आहे.  बारामती शहर आणि परिसरातील होर्डिंगची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर दुसरीकडे प्रशासकीय बाबू कारवाईचा बनाव करीत असताना दिसत आहेत यापूर्वी काही महिन्यांपूर्वी  बारामती नगरपालिकेनच्या खुद्द मुख्याधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले होते मात्र अतिक्रमण विभागाचे संबंधित अधिकारी यांनी कारवाईचा बनाव करीत परिस्थिती जैसे थे ठेवली आहे, तर नावापुरती कारवाई करताना प्रशासन दिसत आहे,  शहरातील मोक्याच्या आणि रहदारीच्या ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर उभे करायचे आणि एखाद्या जाहिरात एजन्सीला ते स्ट्रक्चर भाड्याने द्यायचे किंवा जो येईल त्याला प्रतिदिन स्क्वेअफुटाणे भाड्याने द्यायचे असा जणू धंदाच या होर्डिंग वाल्यांचा झाला आहे. मात्र या धंद्याला सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना घेऊन जाहिरात कर भरणे गरजेचे आहे, याउलट या होर्डिंगची शहरात बेबंधशाही अनिर्बंध सुरूच आहे.

मधल्या काळात नगरपालिकेंच्या माध्यमातून बारामतीतल्या अनेक होर्डिंग धारकांना तसेच खाजगी इमारतीवर केलेल्या होर्डिंग मालकांना नोटीस बजावल्या होत्या, मात्र त्या नोटिशीवर पुढे काय कारवाई झाली ही मात्र गुलदस्त्यात बंद आहे. मात्र शहरातील एकाही होर्डीगला नगरपालिके परवानगीच दिलेली नाही मग हे होर्डिंग कोणाच्या राजश्रयाने लागले आहेत ? आणि नगरपालिका का कारवाई करीत नाही हाही सवालच आहे.

नगरपालिकेचे प्रशासन कारवाई करणार….

शहरात लागलेल्या एकाही होर्डिंगला नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही, तसेच आत्ता पर्यंत होर्डिंगचालकांना दोन वेळा नोटीसा बजावल्या आहेत, नगरपालिकेच्या वतीने आजच्या घडीला कारवाई सुरु केली असून शहरातील धोकेदायक होर्डिंग हटविण्याचे काम सुरु आहे तसेच शहरातील सर्वच बेकायदा होर्डिंगवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.  

error: Content is protected !!