June 26, 2026

शनिवारी माळेगावात भव्य निरंकारी सत्संग सोहळा

IMG-20240509-WA0079
माळेगाव : संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज  यांच्या कृपा आशीर्वादाने व सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी 11 मे रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळात भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरचा  सत्संग सोहळा संत निरंकारी मिशनचे जेष्ठ प्रचारक तथा सांगलीचे सेक्टर संयोजक जालिंदर जाधव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
सातारा झोनमध्ये सांगली जिल्ह्याचा नुकताच समावेश झाल्यानंतर प्रथमच माळेगावात सांगलीचे प्रचारक जालिंदर जाधव यांचे उपस्थित सत्संग संपन्न होणार असल्याने, निरंकारी अनुयायात मोठी उत्सुकता दिसून येत आहे. या सत्संग सोहळ्यात बारामती तालुक्यासह फलटण इंदापूर आदी भागातून मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
सदरचा सत्संग सोहळा येथील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल माळेगाव बुद्रुक. या ठिकाणी होणार आहे. हा सत्संग सोहळा पार पाडण्यासाठी माळेगावचे प्रबंधक मच्छिंद्र तावरे, मनोज भोसले, प्रशांत भोसले, गणेश झांबरे, बाळासाहेब जाधव व त्यांची सर्व टीम विशेष परिश्रम घेणार असल्याचे बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!