June 27, 2026

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त बारामतीनगरी राममय 

IMG-20240122-WA0091
बारामती : अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बारामती नागरीमध्ये राममय वातावरण झाले होते. तर रामनामाच्या जयघोषाने बारामती नागरी भक्तिमय झाली होती.
शहरात अनेक इमारतींसह नागरिकांनी रांगोळ्यासह घरावर विद्युत रोषणाई केली होती,  बारामतीमधील ऐतिहासिक देवळे यांच्या श्रीराम मंदिरात बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या वेळी मोठ्या संखेने महिला उपस्थित होते.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदीरात श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी हनुमान चालिसा पठण व श्रीरामाची आरती करण्यात आली. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली होती. रामनामाच्या जपाने मंदिराचा परिसरासह पूर्ण शहरच भक्तिमय झाले होते, शहरात ठीक – ठिकाणी भगवे झेंडे फडकत होते.  अनेक ठिकाणी मोठे प्लेक्स बोर्ड लावलेले होते. शहरातील महत्वाच्या चौकात कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेक मंडळे व नागरिकांनी लाडू व पेढ्यांचेही वाटप करीत आनंद साजरा केला.

You may have missed

error: Content is protected !!