October 24, 2025

ऑल इंडिया संपादक संघांच्या वतीने “लोकशाही” वरील बंदीचा निषेध

IMG-20240111-WA0047
बारामती :  लोकशाही न्यूज चॅनलवर अचानक 30 दिवस बंदी घातली आहे  या कारवाईच्या निषेधार्थ ऑल इंडिया संपादक संघांच्या वतीने बारामती प्रांतधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन दिले.
     सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे लोकशाही न्यूज चॅनलवरील बंदीची  कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे ऑल इंडिया संपादक संघ केंद्र सरकारच्या या कारवाईचा निषेध करित आहे सरकारने आदेश मागे घ्यावा अशी मागणी ऑल इंडिया संपादक संघांच्या वतीने करण्यात आली आहे.
     यावेळी प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे, पुणे शहराध्यक्ष प्रतिक चव्हाण, बारामती तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे, उपाध्यक्ष जितेंद्र जगताप, पत्रकार निलेश जाधव,  तैणुर शेख,  अमित बगाडे,  गौरव अहिवळे ,शुभम गायकवाड, प्रशांत कुचेकर उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!