July 21, 2026

शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टरसह नांगर २४ तासांत हस्तगत ; सुपा पोलीसांची  दमदार कामगिरी

12

बारामती : आंबी (बु) ता. बारामती येथील शेतकरी राजेंद्र बबन खोमणे यांच्या मालकीचा अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचा जॉन डिअर कंपनीचा ५०४५ मॉडेलचा  ट्रॅक्टर आणि ३० हजार रुपये किंमतीचा नांगर हे दि. १ जून रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंके आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला.

गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासात मिळालेल्या मदतीने संशयित आरोपींचा तपास करण्यात आला. यामध्ये बाळा ऊर्फ अविष्कार संजय तावरे (वय २३ वर्षे, मोरगाव), धिरज संदीप चव्हाण ( वय१८ वर्षे, मुरटी ), रोहन ज्ञानेश्वर माने ( वय१९ वर्षे, रा. मोढवे ), चेतन कानोबा दगडे (वय २५ वर्षे , मोढवे), आणि ओमकार रमेश पवार ( वय २७ वर्षे , रा. मोरगाव) या पाच जणांना अटक करण्यात आली.

आरोपींची कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर व नांगर असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सद्यस्थितीत सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंत वाघोले करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जिनेश कोळी, पोलिस हवालदार रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, विशाल गजरे, दत्तात्रय धुमाळ, किसन ताडगे, महादेव साळुंके, भाऊसाहेब चौधरी, ऋषिकेश वीर, निहाल वणवे, सूरज साळुंके, सचिन दरेकर, सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे, आदेश मवाळ यांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!