June 8, 2026

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत नितीन बांगर यांची उल्लेखनीय कामगिरी

WhatsApp Image 2025-06-05 at 1.08.29 PM (1)

इंदापुर : भारतीय योगा स्पोर्ट ऑर्गनायझेशन अंतर्गत आयोजित इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील सहशिक्षक नितीन बांगर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले.

या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान या देशांतील तब्बल 580 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अशा तीव्र स्पर्धेत नितीन बांगर यांनी योगासने सादर करत न्यायमंडळाची मनं जिंकली आणि भारतासाठी पदकाची कमाई केली.

या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची ही एक गौरवशाली नोंद ठरली आहे.

You may have missed

error: Content is protected !!