June 28, 2026

चायना नायलॉन मांजामुळे बारामतीत अनेक नागरिक जखमी

naylon-manjha

बारामती : नागपंचमीला याही वर्षी चायना नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याने पुन्हा बारामतीचे प्रशासन कारवाई करण्यात हतबल असल्याचे समोर आले आहे.

नागपंचमीला मागील अनेक वर्षांपासून नायलॉन मांजा वापरून पतंग वापरण्याचा आनंद लुटला जात आहे मात्र एकाचा आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतताना समोर येत आहे. इतरांचा पतंग कापण्यासाठी या उद्देशाने बंदी असलेल्या चायना नायलॉन मांजा बेकायदा पतंग उडविण्यासाठी सर्रास वापरला जात आहे.

यावर्षी प्रशासनाने सोशल मीडियावर जीवघेणा चायना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केले होते मात्र तरी देखील बारामतीच्या बाजारात तो मांजा राजरोसपणे विकला जात होता त्यामुळे अनेक नागरिकांना जीवावर बेतले. शहरातील अनेक मांडले सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांना या पूर्वीच निवेदने दिली होती मात्र दरम्यानच्या काळात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यापलीकडे स्थानिक प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली.

चायना नायलॉन मांजामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या गळ्याला तर दोन युवक देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर सकाळी सकाळी एक युवती देखील गंभीर जखमी झाली आहे. या चायना नायलॉन मांजामुळे दरवर्षी नागरिक जखमी होत आहेत त्यामुळे हा चायना नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!