November 28, 2026

नगरसेवक की सह्यांचे कलेक्टर?

IMG_20261128_192549

बारामती : नगरपालिकेत एकाच पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असताना आणि अजितदादांच्या अनुपस्थितीत शहराच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळत असताना, काही मंडळींना अचानक गट तयार करण्याचे डोहाळे लागले आहेत. गटबाजीचा आव आणायचा, २४ नगरसेवकांच्या सह्या घेतल्याचे सांगायचे, मुंबईला जाऊन नेत्यांकडे तक्रारी करायची आणि आपण मोठे राजकीय योद्धे असल्याचा आव आणायचा… या प्रकाराला राजकीय धडपड म्हणायचे की ‘लबाड लांडग्याचे नवे ढोंग’, असा सवाल उपस्थित होत आहे.

नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या हातात अधिकार आहेत. प्रशासनाला बैठक घेण्यास भाग पाडण्याची ताकद आहे. सत्ताधारी गटाला थेट जाब विचारता येतो. जर सत्तेतल्या एका गटाला गटबाजीचे डोहाळे लागले असतील तर नागरी प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित होतो जर एका गटातून निवडणुकीला उभा राहत असाल त्या गटातून निवडणूक जिंकत असाल तर मग शहरातील प्रश्नांवर ठोस भूमिका घेता येते. मग हे सगळे सोडून मुंबईच्या नेत्यांच्या दारात हजेरी लावण्याचे नाटक कशासाठी?

२४ सह्यांचा दावा करून दबाव तंत्र वापरण्याचा काय उपयोग राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यापेक्षा त्या सह्यांमधील नगरसेवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे नाही का? नगरपालिकेत गट तयार करण्याचे सोंग, मुंबईवारीचे नाटक, नेत्यांच्या भेटीगाठींचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष शहराच्या प्रश्नांवर मात्र शांतता… या राजकीय ‘नाट्यप्रयोगा’ला नागरिक किती दिवस सहन करणार?

ज्या पक्षातून तुम्ही निवडून आलात त्या पक्षाचा प्रोटोकॉल काय सांगतो ज्यांच्या लेबलने तुम्ही निवडून आलात त्यांच्याकडून अजिंठा तयार केला जातो आणि मग तो मीटिंग वर मांडला जातो जर तुम्ही पक्षाचीच आचारसंहिता विसरून गेला असाल तर तुम्हाला त्या पक्षाचा टिळा लावण्याचा काय अधिकार अशी देखील चौका चौकात चर्चा सुरू आहे

अजितदादा असताना राजकीय शिस्तीचा धाक होता, असे बोलले जात होते. आता त्यांच्या अनुपस्थितीत कुणीही उठून गटबाजीचे राजकारण करायचे, नेतृत्वाकडे तक्रारींची पोतडी घेऊन जायचे आणि स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लोकहिताचा मुलामा द्यायचा, हा प्रकार कितपत योग्य?

लोकप्रतिनिधी आहात की केवळ सह्यांचे कलेक्टर?

मागील एक वर्षात नेत्यांच्या समोर नागरी प्रश्नांसाठी दोन मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये गटबाजीची चर्चा नाही झाली तिथे मात्र गप्प झालात मग गटबाजीची नौटंकी कशासाठी?

नगरपालिकेतून अशीच गटबाजीचे किरणे बाहेर पडल्यामुळे या गटाला पुन्हा नागरिकांसमोर जायचं आहे का नाही आणि आणि बारामतीचे नागरिक दादांना सवाल उपस्थित करायचे तुम्ही तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे एका गटाचे प्रतिनिधी आहात त्यामुळे वेळीच सावरा आणि नगरसेवक म्हणजे नागरिकांचे सेवक आहात याची जाण ठेवा

राजकारणात नाटक चालते, पण जनतेच्या प्रश्नांवर नाटक चालत नाही. गटबाजीच्या नावाखाली राजकीय ढोंग करण्यापेक्षा नगरपालिकेत ठोस भूमिका घ्या, प्रशासनाला कामाला लावा आणि नागरिकांना उत्तर द्या. अन्यथा या राजकीय सोंगाचा पडदा जनताच खाली खेचेल!

error: Content is protected !!