अंजनगावात होम मिनिस्टर रंगला खेळ पैठणीचा

बारामती : तालुक्यातील अंजनगावात होम मिनिस्टर रंगला खेळ पैठणीचा मध्ये, सन्मान नवदुर्गांचा या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची पैठणी पूजा भिसे यांनी मिळवली.
चंदुकाका सराफ अँड सन्स.प्रा.लि. बारामती यांच्या संकल्पनेतून व निवेदक धनंजय माने खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर सन्मान नवदुर्गांचा यामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी पूजा सागर भिसे यांनी पटकावली तर द्वितीय क्रमांकाचे सोन्याची नथ संगिता भीमदेव चव्हाण, तृतीय क्रमांकाचे बक्षीस चांदीचे नाणे मंगल मोरे, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस चांदीचे पान कोमल किरण मोरे, यांना देण्यात आले.
यावेळी अंजनगावचे सरपंच प्रतिभा परकाळे, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, सुरेश परकाळे, सरफराज शेख, तंटामुक्ती अध्यक्ष संजय वायसे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष दादासाहेब कुचेकर, लावणी सम्राट बाबा कांबळे, शालेय समिती उपाध्यक्ष शकुल मोरे, अरविंद परकाळे, पंकज मोरे, प्रशांत कुचेकर, विलास परकाळे, संजय परकाळे, तुकाराम कुचेकर, सत्यवान कुचेकर, बाळासाहेब कुचेकर, मा. सरपंच बाळासाहेब वायसे, इंद्रजीत वायसे, सचिन कुचेकर, हनुमंत वायसे, किरण मोरे, सुदाम परकाळे, सागर भिसे, कुणाल सकट, ऋषी कुचेकर, अभिजीत कुचेकर, सोनू भिसे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष परकाळे, अमोल परकाळे, मा. उपसरपंच सुभाष वायसे, प्रसाद परकाळे, अमर सस्ते, प्रवीण परकाळे, सचिन चव्हाण, विनोद जगताप आदी उपस्थित होते.