शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळेल अशी बतावणी करून शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या नावाखाली एका महिलेची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मुंढवा, पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, 2 डिसेंबर ते 22 जानेवारी या कालावधीत एका अज्ञात मोबाईल धाराकाने फोन वरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आर्थिक आमिष दाखवून फिर्यादी यांच्याशी वारंवार संपर्क साधून फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून मोबाईल द्वारे एक लिंक पाठवून ती लिंक डाऊनलोड करण्यास सांगून आरोपीच्या वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 23 लाख 50 हजार रुपये घेऊन ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.