October 24, 2025

यापुढे धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत…. खा. सुप्रिया सुळे.

FB_IMG_1717760188583

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन व्यक्तींनी मतदार संघात दहशत निर्माण केली होती. त्यांनी गावोगावी, खेडोपाडी जात कार्यकर्त्यांना धमकावण्याचे काम केले आहे. इतके दिवस मी काहीच बोलले नाही. त्यांनी जर पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली. तर तुमच्या पाठीशी ठाम असेल, तर यापुढे अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत निवडणूक होती म्हणून मी शांत होती पण कोणी नाही मीच त्यांची तक्रार करीन  असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे व्यक्त केला.

खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. खासदार म्हणून चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांचा बारामतीकरांनी विजयी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या या वेळी आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच तालुका अध्यक्ष आर. ए. जगताप, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे आदी उपस्थित होते.

बारामतीत प्रचारादरम्यान फिरत असताना बारामतीतील एमआयडीसी येथील एका कंपनीत एका महिलेच्या कुटुंबातील काही सदस्य कामाला आहेत. ती महिला मला म्हणाली की, मला तुम्हाला मतदान करायचे आहे. तुम्हाला मतदान केले तर.. एमआयडीसीतील ही कंपनी बाहेर तर जाणार नाही ना.. अशी भीती व्यक्त केली. त्यावेळी त्या महिलेला मी म्हटलं, तुम्ही कोणालाही मतदान केले तरी ही कंपनी मी कुठेही जाऊ देणार नाही, असा विश्वास दिला. या महिलेसारखीच अनेकांच्या मनात भीती आहे. ही भीती दूर करण्याचे काम पुढील काळात केले जाईल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. या देशात लोकशाही आहे दडपशाही नाही मतदारांनी ती दडपशाही नाकारली आहे असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं. असे असतानाही आपण प्रामाणिकपणे काम केलं. मात्र मी तुम्हाला विनंती करते की, निवडणुकीच्या काळात जे झाले ते झाले ते गंगेला मिळाले. महागाई, बेरोजगारी याबरोबरच विकासाची आपणाला कामे करायची आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुडाचे राजकारण कधीही केले नाही आणि आपणही कधी करणार नाही.

हा रडीचा डाव…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने दहा जागा लढविल्या पैकी आठ जागा आल्या साताऱ्यातील नववी जागा ही आली असती. मात्र तेथे पक्षाचिन्हाच्या साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीची हक्काची पन्नास हजार मते गेली. हा रडीचा डाव आहे. या संदर्भात मी ठरवलं आहे की, याबाबत न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. व दोन्हीपैकी एकच चिन्ह ठेवा. दोन्ही चालणार नाही. हा रडीचा डाव आहे.लोकांचा संभ्रम होईल अशी चिन्हे पुन्हा देऊ नयेत याची भविष्यात काळजी घेतली जाणार आहे.

अधिकाऱ्याची चूक नव्हती

ज्या अधिकाऱ्याला’ रात्रीची बँक उघडी ठेवायला लावली त्यावर कारवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्याची काही चूक नसताना त्याच्यावर कारवाई झाली.

बारामतीत काही बदल्या होत आहेत.

बारामती अनेक बँकेत, कारखान्यात बदल्या होत आहेत मला एवढेच सांगायचे आहे की कोणाचीही राजकीय सुडापोटी तुमची बदली करून तुमच्यावर अन्याय करीत असेल तर ती थांबवायची जबाबदारी आमची आहे.

You may have missed

error: Content is protected !!