April 10, 2026

बारामतीत ऑनलाईन फसवणूक; डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ९२ लाख ५० हजारांचा अपहार

cybercrime

बारामती : बारामती शहरात ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून इंदापूर रोडवरील एका नामांकित डॉक्टर व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीचे खाते फेडरल बँकेच्या बारामती शाखेत आहे. अज्ञात सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करत रांचीसह उत्तर भारतातील विविध बँक खात्यांमध्ये पैसे वळवले. या व्यवहारांबाबत संशय आल्यानंतर दाम्पत्याने तात्काळ बँक व पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित इसमाने अत्यंत चलाखीने ऑनलाईन व्यवहार करत टप्प्याटप्प्याने ही रक्कम हस्तांतरित केली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!