June 27, 2025

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार ‘ब’ वर्गातून विजयी ; निकालाची प्रतीक्षा शिगेला

WhatsApp Image 2025-06-24 at 6.57.16 PM

बारामती :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बारामती येथील प्रशासकीय भवनात आज (२४ जून) सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात ‘ब’ वर्गातील मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. ‘ब’ वर्गात १०१ मतदारांनी मतदान केले होते, त्यामध्ये अजित पवारांना ९१ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी देवकाते भालचंद्र बापूराव यांना केवळ १० मते मिळाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची उमेदवारी दिल्याने निवडणुकीला रंगत आली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे, मतमोजणीचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती आणि महिला राखीव या गटाच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र अंतिम निकाल अद्याप लागलेले नाहीत. उमेदवार निहाय सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेली मते पुढील प्रमाणे

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात:
एकूण ८,३१६ मते मोजण्यात आली. त्यामध्ये रतन कुमार भोसले (निळकंठेश्वर पॅनल) यांना सर्वाधिक ४,११७ मते मिळाली असून त्यांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ बापूराव गायकवाड यांना ३,७१७ मते मिळाली आहेत.

इतर मागासवर्गीय मतदारसंघात:
एकूण ८,३५३ मते मोजली गेली असून नितीन शेंडे (निळकंठेश्वर पॅनल) यांनी ४,३०० मते मिळवून आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी रामचंद्र नाळे यांना ३,७४४ मते मिळाली आहेत.

भटक्या जमाती मतदारसंघात:
एकूण ८,२७४ मते मोजली गेली. विलास ऋषिकांत देवकाते यांना सर्वाधिक ४,२६९ मते, तर सूर्याजी तात्यासो देवकाते यांना ३,२८८ मते मिळाली आहेत.

महिला राखीव मतदारसंघात:
एकूण ८,५९९ मते मोजण्यात आली. संगीता बाळासो कोकरे (२,१६१ मते), ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले (१,९५९ मते), आणि राजश्री बापूराव कोकरे (२,०२२ मते) या प्रमुख उमेदवार ठरल्या आहेत.

अजूनही मतमोजणी प्रक्रियेत इतर वर्गांचे निकाल येणे बाकी असून अंतिम निकाल पहाटे चार वाजेपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली आहे. मिळालेल्या आकडेवारी नुसार एकूणच निळकंठेश्वर पॅनलचा वरचष्मा असल्याचे सध्याच्या टप्प्यांतून स्पष्ट

error: Content is protected !!