बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा
बारामती : बारामती शहरातील पिण्याच्या पाण्याची वितरण नलिकेचा तांत्रिक घोटाळा झाल्याने बारामती शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे
बारामती नगरपरिषद हद्यीतील पिण्याच्या पाण्याची वितरण नलिकाचा तांत्रिक घोटाळा असल्याने शारदा प्रागण, कसबा व मार्केटयॉर्ड या टाकयावरील खालील भागात पिण्याचा पाणी पुरवठा बुधवार दिनांक २८/०५/२०२५ पासून पाणी पुरवठा होणार नाही. सदरचा पाणी पुरवठा एक दिवसा आड होईल.
कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर,वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, ) कचेरी रोड,छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली, नेवसे रोड. कसाब गल्ली, रामगल्ली, विजयनगर, साठेनगर या परिसरात तसेच गुरुवार दिनांक २९/०५/२०२५, रोजी, कसबा टाकीवरील भागामध्ये शिक्षक सोसायटी, पंचशील नगर,सुतारनेट, शाळा क्रमांक २ परिसर, चांदणी चौक, श्रीराम नगर, सावतामाळी नगर, जगताप मळा सटवाजीनगर, मुजावर वाडा येथे पिण्याचे पाणी सुटणार नाही. तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी काटकसरीने वापरुन नगर
परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आह
