सरकारी कामावर बालकामगाराचा मृत्यु ; ठेकेदार मोकाट

बारामती : सरकारी कामावर बेकायदा बालकामगार ठेऊन त्या बालकामगारांच्या मृत्यूस तसेच जबर दुखापातीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ठेकेदाराच्या सुपरवाईजरवर माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील मौजे खडकआळी पणदारे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या साठवण तलावाचे काम सुरु आहे त्या कामावर काम करीत असताना एका अल्पवयीन कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे त्यामध्ये साहिल नईम शेख ( वय १७ वर्षे ) या अल्पवयीन कामगाराचा मृत्यु झाला आहे.
तलावाचे खोदकामाच्या ठिकाणी साहिल नईम शेख ( वय १७ ) हा दिनांक 13 मार्च रोजी दुपारी 1 वा. सुमारास ट्रॅक्टर MH 42 Q1244 त्यामागील ट्रैली सह स्वतः चालवून सोबत दीपक शामसुंदर प्रजापती (वय १७) यास घेऊन जात असताना सदर ट्रॅक्टर खोदकामा शेजारील कच्च्या रस्त्यावरून खचून तलावाच्या खोदक होत असलेल्या खड्ड्यात पडून अपघात होऊन अपघातात साहिल नईम शेख स्वतःच्या मृत्यूस स्वतः तसेच दीपक शामसुंदर प्रजापती यांच्या दुखापतीस कारणीभूत झाला, सुपरवायझर बापू नाथ्याबा नरुटे ( रा. पाहुणेवाडी ता. बारामती ) यांनी साईटसुपरवाईजर असताना हाय गयीने अविचाराने अल्पवयीन दीपक शामसुंदर प्रजापती ( वय १७ रा. आंदिला देवरीया उत्तर प्रदेश ) व साहिल नईम शेख ( वय १७ वर्षे रा. मजेलीराज, सलीमपुर, देवरिया उत्तर प्रदेश ) या दोन अल्पावईन कामगारांना कामास ठेवून सदर कामावर वापरण्यासाठी त्यांना ट्रॅक्टर विनापरवाना तसेच लायसन नसताना वापरण्यास दिला आणि कामावर मयत ट्रॅक्टर चालक साहिल नईम शेख ( वय १७ वर्षे ) आणि सुपरवायझर बापू नाथ्याबा नरुटे या दोघांविरोधात विरोधात बालकामगार प्रतिबंधक अधिनियमाने माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र सदरच्या सरकारी कामावर बालकामगाराचा मृत्यु झाला या घटनेत ठेकेदार नामानिराळा राहिला आहे. काम सुरु असताना अनेक सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाली आहे, तसेच कामाच्या ठेक्याच्या नियमानुसार या घटनेची जबाबदारी ही ठेकेदाराची असून संबंधित ठेकेदाराला देखील आरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय दरबारी करणार आहेत.