दुकानादारानेच केली दुकानात अफरातफर ; 47 लाखांचा घातला कंपनीला गंडा

बारामती : बारामतीत एका दुकांदारानेच दुकानात अफरातफर केली असून ज्या कंपनीने मोठ्या विश्वासाने लाखो रुपायांचा माल विक्रीसाठी दिला त्या कंपनीलाच गंडा घातल्याची घटना घडल्याचा गुन्हा बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात सृजल टेलीकॉम या कंपनीचे व्यवस्थापक निक्सन बेन्नी म्हात्रे रा.पिंपरी यांनी सुरज तावरे यांच्या विरोधात दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत अशी की डिसेंबर 2023 मध्ये सृजल टेलीकॉम या कंपनी मार्फत सिनेमारोड बारामती येथे मोबाईल विक्रीची शाखा काढण्यात आली त्यासाठी कंपनीच्या मार्फत सुरज तावरे यांना त्यांच्या मालकीच्या जागेत बारामतीच्या शाखेचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करून विविध कंपनीचे लाखो रुपयांचे मोबाईल विक्रीस दिले मात्र नऊ महिन्यात कंपनीच्या स्वाफ्टवेअरमध्ये छेडछाड करून खोट्या ग्राहकांची माहिती भरून नऊ मोबाईलचे पैसे कंपनीच्या खात्यांवर जमा केले नाहीत हे लक्षात आले त्याची चौकशी करीत असताना प्रत्यक्ष पाहणी वेळी मात्र दुकानात त्याच्याही पेक्षा वेगळे चित्र पाहाला मिळाले दुकान तपासणीत आणखी 79 मोबाईल गायब असल्याचे निदर्शानास आले त्याची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली सदरच्या विक्रेत्याने कंपनीला साधारण 88 मोबाईलचा हिशोब गायब असल्याचे निदर्शनास आले असे एकूण 31 लाखांचे मोबाईल आणि दुकानाच्या देखभालीसाठी दिलेले दहा लाख एकूण साधारण 47 लाखांचा गंडा घातल्याचे निदर्शनास आले त्या कारणावरून’ तावरे यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.