December 14, 2025

इस्टेटीसाठी सासूला संपविण्याचा प्रयत्न

fir-1

बारामती :  खुणाची केस मागे घेण्यासाठी आणि इस्टेटीसाठी जावयाने सासूला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामतीत घडली आहे.

सविस्तर हकीकत अशी की जामीनवार सुटलेला आणि 2016 साली ज्या जावयाने सासऱ्याचा आणि सख्या मेव्हणीचा खून केल्याचा संशय आहे त्या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून सासऱ्याला संपवल्यानंतर सासूचा काटा काढण्या प्रयत्न जावयाने केल्याची घटना बारामतीत घडली आहे.

तुमच्यामुळे मला जेलमध्ये आठ वर्षे काढावी लागली, तेव्हा तुला मी सोडणार नाही, तुला संपवल्याशिवाय राहणार नाही, तूच मला आडवी येतेस असे म्हणून सासूचा गळा दाबून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न जावयाने केला या प्रकरणी विशाल सोपान वत्रे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!